आरोग्य समस्येचे भाकीत

मानवाला किती अवयव असतात? तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न जरा विचित्र वाटेल किंवा शरीराबद्दल असा प्रश्न विचारणारा माणूस वेडा वाटेल. जर स्पष्ट बोलायचे झाले तर हा प्रश्न वेगळा नाही तर त्याला अर्थ आहे. उदाहरणार्थ, सूर्य! तो एक आहे. त्याभोवती उष्णतेची कडी आहेत. ती मोजणे अशक्य आहेत. अगदी तसचं एक मनुष्य केवळ एक शरीर घेऊन जगत असतो. जी दृश्य असते. मात्र त्या शरीरात आणखी एक अदृश्य शरीर वास करत असते. हे तुम्हाला माहित आहे का? किंवा तुमचा यावर विश्वास आहे का?  

तुम्हाला सविस्तर सांगतो. एखाद्या व्यक्तीच्या सहवासात तुम्ही अगदी आनंदी असता किंवा दु:खी असता हे तुम्हाला पटते का? आम्हाला माहित आहे की, तुम्ही या मताशी सहमत असाल! याचाच अर्थ प्रत्येक मानवी शरीराच्या भोवती एक वलय असते. तर पुढे असा प्रश्न उपस्थित राहतो की: या अदृश्य शरीराचा फायदा काय? आपल्याला ही गोष्ट माहिती असून किंवा नसून काय मोठा फरक पडणार आहे?

एका सुदृढ महिलेचे म्हणजे सुरेखाचे उदाहरण घेऊया! तिला एकदा बायो-वेल कॅमेराचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. अमेरिकेमधल्या कुठल्याशा प्रदर्शनात हा प्रकार घडला. इथले वातावरण अगदी प्रफुल्लीत होते आणि प्रत्येकाला नव्या गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा होती. सुरेखाने देखील आपल्या अदृश्य शरीराचे छायाचित्र काढून घेतले. बायो-वेल कॅमेराच्या माध्यमातून आपल्या अदृश्य शरीराचे किंवा कड्याचे छायाचित्र काढणे शक्य असते. याला कॉरोनल डिस्चार्ज असे म्हणतात. एकदा का छायाचित्र घेतले की, स्टॉलवर असलेल्या तज्ज्ञांनी ते लागलीच प्रोसेस केले आणि तिचा रिपोर्ट तयार केला.

सुरेखाने आश्चर्य व्यक्त करत विचारले, “हा रिपोर्ट काय सांगतो आहे?” तज्ज्ञ म्हणाले की, “सगळं ठीक आहे. तुम्हाला आपाद-मस्तक पाहून मला आनंद वाटतो आहे. मात्र हा एक ठिपका, बघ जर तुला दिसला तर! तू तुझ्या दातांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तो दर्शवतो आहे. जर तुला त्याठिकाणी वेदना झाली...”

“अरे खरंच का? या इमेजकडे पाहून तुम्हाला माझ्या दातांचे भविष्य दिसते आहे यावर माझा विश्वासच बसत नाही!” त्यानंतर लवकरच सुरेखा भारतात परतली. पण पुढे सहा-आठ महिन्यांनी काय झाले? तिचे दात तिला त्रास देऊ लागले! तिने जेव्हा उपचार घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिला अचानक हा सगळा प्रकार आठवला, “अरे देवा! त्या प्रदर्शनातील तज्ज्ञाने माझी किरलायन फोटोग्राफी केल्यानंतर हेच सांगितले होते.”

हा मुद्दा आहे. आपण जेव्हा काहीतरी शिजवत असतो तेव्हा अन्नाचा गंध आपल्या नाकापर्यंत पोहोचतो न? आपले अदृश्य शरीर देखील तसेच काम करते. जेव्हा आपल्याला संकेत मिळतात तेव्हा आपल्याला त्यांची शक्तीस्थळे, उणीवा, चांगुलपणा आणि वाईट प्रकार समजला पाहिजे. आपल्या अदृश्य शरीरातून किंवा कड्यातून ही वैशिष्ट्ये किंवा महत्त्व आधीच वाहायला सुरुवात झालेली असते. जर आपल्या सोबत काय घडणार आहे याची माहिती अगोदरच झाली तर त्या शारीरिक व्याधीशी मुकाबला करण्याकरिता आपण सज्ज होऊ शकतो. किरलायन फोटोग्राफी किंवा बायो-वेल कॅमेराने इमेज काढल्याने आपल्याला शरीरात लपलेल्या समस्या जाणून घेण्यास मदत मिळते आणि आपण सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करू शकतो, आपल्या प्रकृतीची उत्तम काळजी घेऊ शकतो. 

तुमच्या आयुष्यात बायो-वेल कॅमेरा आणि किरलायन फोटोग्राफीचे स्वागत करून तुम्ही शांत चित्त आणि आरोग्य राखू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, “भारतात मी हे तंत्र कुठे सापडेल?” तर, आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रसिद्ध डॉ. जे. एम. शहा यांचे आभार! तुम्हाला या संबंधीची अधिक माहिती पुढच्या लेखात देऊ. तर मग वाचत रहा मित्रांनो!

बायो-वेल कॅमेरा आणि किरलायन फोटोग्राफीबद्दल अधिक माहितीसाठी www.jmshah.com वर लॉग ऑन करा.

 

Get In Touch!

Address: 11, Sona Udyog, Andheri (East), Mumbai

Tel.: +91 22 6735 3637

Mobile:+91 98210 55216

Email: jashvant2@gmail.com

biowell